Ram Gopal Varma : प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास ! कोर्टाने ‘त्या’ प्रकरणी ठोठावली शिक्षा

बॉलीवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना कोर्टाकडून 3 महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात कोर्टाने आज हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात रामगोपाल वर्मा यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नेमके काय प्रकरण आहे जाणून घेऊया…
काय आहे नेमके प्रकरण?
2018 साली श्री नावाच्या कंपनीने रामगोपाल वर्मा यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामगोपाल वर्मा यांनी 7 वर्षांपूर्वी एक चेक दिला होता. तो चेक चेक बाऊंस झाला होता. या प्रकरणी रामगोपाल वर्मा यांना दोषी ठरण्यात आले आहे. 21 जानेवारी रोजी रामगोपाल वर्माला न्यायालयात सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते, मात्र ते हजर राहिले नाहीत.
त्यानंतर, न्यायालयाने फिर्यादीला 3.72 लाख रुपये मोबदला म्हणून देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स ॲक्टच्या कलम 138 अन्वये आरोप ठेवत आरोपीला दोषी ठरवले आहे. त्यामध्ये, 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. श्री कंपनीचे प्रमुख महेशचंद्र मिश्रा यांनी चेक बाऊंसप्रकरणी हा खटला दाखल केला होता.
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा सध्या ‘सत्या’ सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यक्त असून सत्या सिनेमाची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा आहे. तसेच उद्या रामगोपाल वर्माकडून ‘सिंडिकेट’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे. रामगोपाल वर्मा गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात असल्याची चर्चा बॉलिवूड विश्वात आहे. रामगोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी आतापर्यंत सत्या, रंगीला, कंपनी, सरकार, 26/11 यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.





