Arjun Kapoor : ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने काढला खास टॅटू; नेटकरी म्हणतात…..

Arjun Kapoor | अभिनेता अर्जुन कपूरने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात खलनायकाची भूमिका उत्तमरित्या साकारली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले. मात्र अनेकदा अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला आहे.
अलीकडेच मलायकासोबत ब्रेकअप झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आता त्याने एक खास टॅटू आपल्या शरीरावर गोंदवला आहे. सध्या अभिनेत्याचा हा टॅटू चर्चेचा विषय ठरत आहे. नेमका अर्जुनाचा हा खास टॅटू कोणासाठी आहे? असा सवाल नेटकरी करत आहेत.
अभिनेत्याने पाठीवर ‘रब राखा’ असं गोंदवून घेतलं आहे. याचा अर्थही त्याने पोस्टमध्ये सांगितला आहे. “रब राखा – देव नेहमी तुझ्यासोबत राहील. माझी आई सुख आणि दु:खात नेहमी हे म्हणायची. आजही मला वाटतं की ती माझ्याबरोबर आहे. माझ्यावर लक्ष ठेवतेय आणि मला योग्य दिशा दाखवतेय’. अशी भावनिक पोस्ट अर्जुनेन लिहिली आहे.
अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले…
View this post on Instagram
“रब राखा – ईश्वर नेहमी तुमच्याबरोबर आहे. माझी आई चांगल्या आणि वाईट काळातसुद्धा हे वाक्य नेहमी म्हणायची. आजही मला वाटतं की, माझी आई माझ्याबरोबर आहे, ती माझ्यावर लक्ष ठेवून मला मार्गदर्शन करत आहे. असं तो म्हणतो.
अर्जुनने पुढे लिहिले आहे की, “’सिंघम अगेन’च्या रिलीजच्या आधी मी हा टॅटू गोंदवला आहे. आता जेव्हा मी माझ्या आयुष्यातील नव्या टप्प्यावर आहे, तेव्हा मला वाटतं की माझ्या आईने मला पाठिंबा दिलाय आणि ती मला सांगत आहेत की, या युनिव्हर्सची माझ्यासाठी काहीतरी योजना आहे.
आई, मला श्रद्धा शिकवल्याबद्दल धन्यवाद, रब राखा, नेहमीच.” असं म्हणत त्याने त्याच्या आयुष्यात त्याच्या आईचे असलेले महत्त्वाचे स्थानही दाखवून दिले आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट आणि लाईक्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, अभिनेता अर्जुनने 2012 मध्ये परिणीती चोप्रासोबत ‘इशकजादे’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने ‘2 स्टेट्स’ आणि ‘गुंडे’मध्येही चमकदार अभिनय केला.
तसेच, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अर्जुन कपूरसोबतच अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, रवी किशन यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.





