बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने चित्रपटाच्या फीबाबत मांडलं ‘मत’

bollywood । तब्बू बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. इंडस्ट्रीत कमबॅक केल्यापासून तब्बूने ‘अंधाधुन’, ‘भूल भुलैया 2’, ‘द क्रू’, ‘दृश्यम 2’ यासह अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता त्याचा ‘और में कहाँ दम था’ हा नवीन चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या तब्बूच्या एका मुलाखतीदरम्यान, फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिला कलाकारांना पुरुष कलाकारांच्या तुलनेत कमी फी मिळत असल्याचा प्रश्नावर आपलं मत मांडलं आहे.
मुलाखतीत तब्बू म्हणाली, ‘प्रत्येक मीडिया व्यक्ती केवळ फीमधील फरकाबद्दल महिलांशी बोलते. प्रत्येक पत्रकार महिलेलाच विचारतो, तुम्ही जाऊन पुरुष अभिनेत्याला का विचारत नाही की त्याला जास्त मानधन का मिळते? त्याचा दृष्टीकोन ऐकणे मनोरंजक असेल. तुम्हाला माहीत आहे का की पुरुषाला जास्त पगार मिळतो, माझ्या पगारबाबत सांगायचं झाल्यास मला मोबदला मिळत आहे याचा मला आनंद आहे.’
औरों में कहाँ दम था’ या चित्रपटाविषयी सांगायचे तर, तब्बू अभिनेता अजय देवगणसोबत दिसली होती. या दोघांचा हा 10वा चित्रपट आहे. 90 च्या दशकात अजय आणि तब्बूची जोडी खूप आवडली होती. मात्र, या चित्रपटातील त्याच्या कामाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवरही हा पिक्चर पहिल्या दिवशी मोठी कमाई करू शकला नाही.





