Poonam Panday : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे महाकुंभात करणार शाही स्नान

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल असलेली पूनम पांडे ही तिचा लूक आणि आगळ्या वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी पूनम पांडे तिच्या मृत्यूच्या बातमीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. पण, काही वेळानं तिनं समोर येऊन ती जिवंत असल्याचं जाहीर केलं आणि फक्त जाहीरातीचा भाग म्हणून ती अफवा पसरवल्याचंही स्पष्ट केलं. पण त्यानंतर मात्र, नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती.
यानंतर आता पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडे पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी पूनम पांडे कॅज्युअल लूकमध्ये दिसली. त्यावेळी पूनम पांडेला पॅपाराझींनी कुठे निघालात अशी विचारणा केल्यावर तिनं सांगितलं की, ती महाकुंभात स्नान करण्यासाठी जात आहे. तसेच, परत येऊन ती सर्वांना प्रसाद देईल, असंही तिनं सांगून टाकलं. आता पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा पूनम पांडेवर टीकेची झोड उठवली आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केली टीका
मॉडेल पूनम पांडे महाकुंभ मेळाव्याला जात असल्याचं समजताच नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.तर काहींनी तिचे समर्थन केले आहे. एका युजरनं कमेंट करत लिहिलं की, पूनम पांडे कितीही मॉर्डन असली तरी ती कुंभमेळ्याला जाऊन स्नान करणार आहे, ही मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, बरं, हे चांगलं झालं, आता तू सनी लिओन आणि मिया खलिफा यांनासुद्धा सोबत घेऊन जा अशा प्रकारच्या कमेंट येताना दिसत आहेत.





