बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला झाली,’अन्नातून विषबाधा’

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार,तिला अन्नातून विषबाधा झाली यानंतर जान्हवीला त्वरित दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रिपोर्टनुसार, जान्हवी चेन्नईहून मुंबईला परतली आणि दुसऱ्या दिवसापासून ती अस्वस्थ वाटत होती. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून तिने तिची सगळी कामं पुढे ढकलली. जान्हवीला लवकरच डिस्चार्ज मिळेल. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूरचे शेड्यूल खूपच व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. ती एकामागून एक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. कामाचा व्याप आणि दगदग यामुळे तिची प्रकृती बिघडली .
दरम्यान, ती तिच्या ‘उलज’ चित्रपटाचे प्रमोशनल इव्हेंट्स देखील करत आहे, ज्यामुळे ती तिच्या तब्येतीची काळजी घेऊ शकली नाही. जान्हवीचे चाहते तिच्या तब्येतीबद्दल खूप चिंतेत आहेत आणि ती लवकर बरी व्हावी यासाठी शुभेच्छा देत आहेत.
जान्हवीच्या ‘उलज’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ती या चित्रपटात सुहाना भाटियाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, आदिल हुसैन, राजेश तैलंग, मियांग चांग, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी यांच्याही भूमिका आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सुधांशू सारिया यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.





