Sooraj Pancholi : बॉलीवूड अभिनेता सुरज पांचोलीला ॲक्शन सीन शूटदरम्यान मोठी दुखापत; नेमकं काय घडलं?

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सूरज पंचोली त्याच्या आगामी अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ॲक्शन सीन शूट करताना त्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. ‘केसरी वीर: लेजेंड ऑफ सोमनाथ’च्या शूटिंग दरम्यान त्याला ही गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्याच्या मांडीला दुखापत झाली आणि त्याच्या हॅमस्ट्रिंगलाही दुखापत झाली आहे.
काय घडले नेमके?
चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. ज्यामध्ये अॅक्शन डायरेक्टरने सूरजला एक स्टंट करण्याची सूचना केली. त्याला एका आतिशबाजीच्या स्फोटावरून उडी मारावी लागली. चित्रीकरणाच्या वेळेपूर्वी थोडासा स्फोट झाला आणि अभिनेता त्यात अडकला. वापरलेल्या गनपावडरमुळे त्याच्या मांडीला आणि हॅमस्ट्रिंगला गंभीर भाजले.आतिशबाजीच्या स्फोटामुळे तीव्र वेदना आणि जळजळ होत असतानाही, अभिनेत्याने ब्रेक घेण्यास नकार दिला आणि संपूर्ण वेळापत्रकानुसार शूटिंग सुरू ठेवले.
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर प्रिन्स धीमान दिग्दर्शित ‘केसरी वीर: लेजेंड ऑफ सोमनाथ’ हा सूरज पंचोलीचा पहिला बायोपिक आहे. हा चित्रपट गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात झालेल्या युद्धाभोवर आधारित आहे. या चित्रपटात सूरजसोबत सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि आकांक्षा शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. रिपोर्ट्सनुसार, विवेक ओबेरॉय या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
कोण आहे सुरज पांचोली?
सूरज पंचोली हा अभिनेता आदित्य पंचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ या रोमँटिक-अॅक्शन चित्रपटातून सूरजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सूरजसोबत अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत दिसली होती. त्याने आतापर्यंत हिरो आणि सॅटेलाईट शंकर या चित्रपटामध्ये काम केले आहे.





