Bodybuilding Competition | ‘गणेश बनकर’ ठरला पुणे-श्री चा मानकरी…

Bodybuilding Competition | – द हिंदू फाऊंडेशन आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव मित्र परिवाराच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना, पुणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे पुणे श्री २०२४, द हिंदू श्री २०२४, मेन्स फिजिक श्री २०२४ आणि वूमन फिजिक श्री २०२४ हि देशातील एकाच स्पर्धेत चार टायटल असलेली एकमेव स्पर्धा संप्पन्न झाली. या स्पर्धेमध्ये पुणे श्री २०२४ चा मानाचा किताब जिम वर्ल्ड जिमचा गणेश बनकर याने पटकावला.
पुणे श्री २०२४ ‘किताब विजेता जिम वर्ल्ड जिमचा गणेश बनकर यास रोख रक्कम रुपये २१,१११/-, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, अप्पर ट्रॅक, टी शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले. द हिंदू श्री २०२४ चा मानकरी, सीगल जिमचा संदेश नलावडे हा ठरला.यास रोख रक्कम रुपये ११,१११/-, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, अप्पर ट्रॅक, टी शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.
मेन्स फिजिक श्री २०२४ चा मानकरी, के स्केवर जिमचा रुपेश कसबे हा ठरला.यास रोख रक्कम रुपये ७,७७७/-, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, अप्पर ट्रॅक, टी शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले. वूमन फिजिक श्री २०२४ च्या मानकरी क्वॉन स्केवर फिटनेस जिमच्या अनामिका सिंग या ठरल्या. त्यांना रोख रक्कम रुपये ५,५५५/-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले. देशातील जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत फक्त याच स्पर्धेमध्ये एकूण रक्कम रुपये पाच लाखाची बक्षिसे देण्यात आली. बेस्ट पोझर चा विजेता सी ओ पी जिमचा संदीप तिवडे हा ठरला तसेच मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर चा विजेता प्लॅनेट फिटनेस जिम चा अजय रक्ताटे हा ठरला.
स्पर्धेचे उदघाटन व पारितोषिक वितरण भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार सुनील कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, स्थायी समिती माजी अध्यक्ष हेमंत रासने ,भाजपा माजी केंद्रीय चिटणीस सुनील देवधर, माजी नगरसेवक दीपक पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, माजी. भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश घोष, भाजपा पुणे शहर सरचिटणीस, भाजपा पुणे शहर सरचिटणीस रवी साळेगावकर, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी केले. स्पर्धेचे सूत्र संचालन राजेंद्र नांगरे यांनी केले. स्पर्धेत प्रशांत जगताप, नंदकुमार कळमकर, मुस्तफा पटेल, मयूर मेहेर, सागर येवले, सलीम सय्यद, सचिन टापरे यांनी ऑफिशिअल आणि पंच म्हणून यांनी काम पहिले. आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केले.



