Pune News : नेहरू स्टेडियमजवळ कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह
Pune News : स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल
Updated On:

पुणे : स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव शुभ्रत बनसोडे असून, तो काळेपडळ परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर व्यक्तीचा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला असून, आज गाडी असलेल्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने घटना उघड झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
PM Modi: देश संकटात असताना विरोधकांना आनंद… ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात





