धक्कादायक! मूल होत नसल्याने छळ; विवाहितेची आत्महत्या
Updated On:

बोदवड – राज्यात महिलावरील अत्याचाराच्या घटनामध्ये दिवसागणीक वाढ होताना दिसून येत आहे. महिला अत्याचाऱ्यांमध्ये कौटूंबीक अत्याचाराच्या घटना सुद्धा समोर येताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे घडली आहे. मूलबाळ होत नाही म्हणून सासरच्याकडून छळ होत असल्यामुळे विवाहितेने होणाऱ्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
भावना नीलेश महाजन ,वय 27 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती नीलेश सुभाष महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण अशोक माळी यांनी फिर्याद दिली आहे.





