Bobby Deol: बॉबी देओलच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं

Bobby Deol| बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. आजही त्याच्या या चित्रपटातील एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याशिवाय तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.
बॉबीचा हा व्हिडीओ फिल्मी ग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो मुंबईच्या एका रेस्टॉरंट बाहेर उभा असल्याचे दिसते. यात बॉबी बाहेर येतो आणि तिथे दोन गरीब मुलं असतात. त्यांना बॉबी 500 रुपये देतो. त्यानंतर त्यांच्यासोबत तो फोटो काढतो. बॉबीनं त्यांच्यासोबत फोटो काढल्यानंतर तो त्यांच्याशी संवाद साधतो. त्याच्या ह्याच कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
View this post on Instagram
बॉबीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉबीचं मन फार मोठं आहे,’ ‘बॉबी फार इमोशन्ल आहे,’ अशा कमेंट त्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, बॉबीची’आश्रम’ ही सीरिज चांगलीच गाजली आणि त्यामुळे बॉबी देओलला त्याचा अभिनय दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली. त्याच्या या सीरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
बॉबीच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर, तो लवकरच तमिळ चित्रपट ‘कंगुवा: ए माइटी वैलिएंट सागा’ आणि ‘हरि हर वीरा मल्लू’ हा तेलगू चित्रपटात दिसणार आहे.





