Bobby Deol | बॉबी देओलने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान कार

Bobby Deol | बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलच्या ‘ॲनिमल’मधील भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर आता चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या तो त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. बॉबी देओलने नुकतीच आलिशान कार खरेदी केली आहे.
त्याने आलिशान गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कारची खरेदी करण्यासाठी बॉबी देओलने खास लुक केला होता. यावेळी त्याने ब्लॅक टी-शर्ट आणि ग्रे पॅन्ट परिधान केली होती. तर ब्लॅक कॅप, ब्लॅक गॉगल आणि व्हाइट रंगाचे शूज घालून त्याने एकदम क्लासी लूक केला होता.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, बॉबी देओलने रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही गाडी खरेदी केली आहे. ज्याची किंमत 2.95 कोटी रुपये आहे. आलिशान कारचा रंग ब्लू मॅट फिनिश आहे. बॉबी देओलकडे या व्यतिरिक्तरेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज बेंज एस क्लास यांसारख्या आलिशान कार आहेत. Bobby Deol |
दरम्यान, बॉबी देओल’ॲनिमल’सह ‘कंगुवा’, ‘डाकू महाराज’ चित्रपटात झळकला आहे. ‘याशिवाय त्याची ‘आश्रम 3 ‘ सीरिज देखील सुपरहिट ठरली आहे. Bobby Deol |
हेही वाचा:
“तुम मराठी लोक गंदा है…”; घाटकोपरमध्ये मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक, मनसे स्टाइल शिकवला धडा




