नवीन इलेक्ट्रिक BMW i5 कार भारतात लाॅंच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

BMW i5 Launch: बीएमडब्ल्यू इंडियाने i5 इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केली आहे. या कारची किंमत 1.20 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. सध्या, i5 भारतात फक्त टॉप मॉडेल M60 xDrive प्रकारात उपलब्ध असेल. BMW इंडियाकडे आता 5 इलेक्ट्रिक वाहने आहेत, ज्यात iX1, iX xDrive50, i4 आणि i7 यांचा समावेश आहे. i5 चे बुकिंग 4 एप्रिलपासून सुरू झाले आहे.
M60 xDrive प्रकारात, BMW i5 83.9kWh (वापरण्यायोग्य 81.2kWh) बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 516 किलोमीटर (WLTP नुसार) धावू शकते. यात दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत – एक समोर आणि एक मागील बाजूस. ते एकत्रितपणे 601hp पॉवर आणि 795Nm टॉर्क जनरेट करतात. BMW चा दावा आहे की हे वाहन 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 3.8 सेकंदात घेऊ शकते आणि त्याचा टॉप स्पीड 230 किलोमीटर प्रति तास आहे.
BMW या कारसोबत मोफत 11kW चा वॉल चार्जर देत आहे, पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 22kW चा AC चार्जर स्वतंत्रपणे खरेदी करू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की हे वाहन 205kW च्या DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यासह, 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल.
BMW i5 ला 12.3-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 14.9-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन मिळते. त्याची इन्फोटेनमेंट सिस्टम BMW च्या नवीनतम iDrive 8.5 OS वर चालते आणि गेमिंग आणि व्हिडिओ फंक्शन्ससह येते. यात 245/40 R20 (समोर) आणि 275/35 R20 (मागील) टायर आहेत. यात 20 इंची अलॉय व्हील्स आहेत.




