BMC Elections 2025। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार हे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची कमान आपल्या हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात यात आहे. त्यासाठी उद्या दुपारी १२ वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि प्रमुख मुंबई पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. ठाकरे बंधू- काँग्रेस युतीवर चर्चा BMC Elections 2025। शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंशी जुळवून घेणार की काँग्रेसशी युती करणार? आगामी निवडणुका महाविकास आघाडी (एमव्हीए) म्हणून लढवायच्या की नाही यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या भूमिकेमुळे ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मतदार यादीतील अनियमितता आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठीची रणनीती यावर चर्चा देखील होणार असल्याचे म्हटले जात आहे. मनसेबाबत पवारांची भूमिका काय? BMC Elections 2025। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिका निवडणुकीत सहभागी करून घेऊ इच्छिते. परंतु, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याला सहमत नाही. काँग्रेस म्हणते की या परिस्थितीत ते स्वबळावर निवडणुका लढतील. प्राप्त माहितीनुसार, शरद पवार यांनी, जर आपण मतचोरीच्या विरोधात एकत्र लढू शकतो, तर निवडणुका का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच शरद पवार देखील उद्धव ठाकरेंच्या बीएमसी निवडणुकीसाठी राज यांना सोबत आणण्याच्या निर्णयाशी सहमत आहेत. मात्र यावर अंतिम निर्णय झालेला नाही. राज्यातस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आधीच सुरू आहे. मतदान २ डिसेंबर रोजी होईल आणि निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होतील.