“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास ; पॉप स्टार केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास

Blue Origin Mission । अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या कंपनी ब्लू ओरिजिनने मिशन एनएस-३१ यशस्वीरित्या पूर्ण करून इतिहास रचला आहे. या मोहिमेअंतर्गत, त्यांची होणारी पत्नी लॉरेन सांचेझ, पॉप स्टार केटी पेरी आणि सहा महिला सदस्यांनी काल अंतराळ प्रवास केला. ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटने वेस्ट टेक्सास येथून उड्डाण केले. हे रॉकेट सुमारे १०५ किलोमीटर उंचीवर पोहोचले, ज्याठिकाणो प्रवाशांना काही मिनिटांसाठी गुरुत्वाकर्षणाचा अनुभव आला नाही. हे १० मिनिटांचे पूर्णपणे स्वयंचलित उड्डाण होते.
११ मिनिटांत मिशन पूर्ण झाले Blue Origin Mission ।
अमेरिकन उद्योगपती जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीचे रॉकेट सोमवारी संध्याकाळी ७ वाजता टेक्सासमधील व्हॅन हॉर्न लाँच पॅडवरून उड्डाण करण्यात आले. सुमारे ११ मिनिटांनी ते परत आले. या कालावधीत, रॉकेटने जाऊन-येऊन एकूण २१२ किमी अंतर कापले. केटी पेरी आणि लॉरेन व्यतिरिक्त, या मोहिमेवर गेलेल्या महिलांमध्ये टीव्ही प्रेझेंटर गेल किंग, मानवाधिकार कार्यकर्त्या अमांडा गुयेन, चित्रपट निर्मात्या कॅरिन फ्लिन आणि नासाच्या माजी रॉकेट शास्त्रज्ञ आयशा बोवे यांचा समावेश होता.
Katy Perry exiting the rocket capsule. pic.twitter.com/rSIApEQ8m2
— Pop Crave (@PopCrave) April 14, 2025
केटी पेरीने अंतराळात गाणे गायले
मोहिमेदरम्यान, गायिका केटी पेरीने लुई आर्मस्ट्राँगचे ‘व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड’ हे गाणे गायले. टीव्ही प्रेझेंटर गेल किंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की वरून पृथ्वी खूप खास दिसत होती. अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर केटी पेरी भावनिक दिसत होती. तिने असेही म्हटले की मातृत्वानंतर हा तिच्यासाठी सर्वात खास अनुभव होता.
‘अंतराळवीर होण्याचे स्वप्न कधी पाहिले नव्हते’ Blue Origin Mission ।
एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार, या मोहिमेचा भाग असलेली टीव्ही प्रेझेंटर गेल किंग म्हणाली की ती घाबरली होती आणि तिने कधीही अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते, परंतु तिने तिच्या भीतीवर मात केली आणि लँडिंगच्या वेळी ती शांत होती. ब्लू ओरिजिनचे प्रवक्ते बिल किर्कोस म्हणाले की, काही लोकांनी या मोहिमेसाठी भाडे दिले, तर काहींनी मोफत प्रवास केला.





