गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने आणले रक्त; गडचिरोली जिल्ह्यातील घटना
Updated On:

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आरेवाडा गावात मातोश्री चौधरी नामक गर्भवती महिलेची नुकतीच प्रसूती झाली. प्रसूतीवेळी रक्तस्त्राव झाला. त्यामुळे रक्तअभावी महिलेचा जीव धोक्यात आला होता.
मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला होता, अशा परिस्थितीमध्ये हेलिकॉप्टरने रक्त आणायचे हा एकमेव पर्याय उरला होता. त्यानुसार या गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची तातडीने व्यवस्था करण्यात आली. भामरागाड येथून रक्त घेऊन हेलिकॉप्टर आरेवाडा गावात आले व आरोग्य केंद्राच्या आवारातच ते उतरवण्यात आले.
रक्त मिळताच गर्भवती महिलेचे प्राण वाचले व सुखरूपपणे या महिलेची प्रसूती झाली. बाळाचा जन्मही सुखरूप झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. या घटनेनंतर आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




