खालापूर, (वार्ताहर) – धनगर समाजाला (एसटी सर्टिफिकेट) आरक्षण मिळावे, यासाठी सकल धनगर समाज खालापूर तालुका यांच्या वतीने पालीफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज आरक्षणाबाबत आपल्या विविध मागण्या घेवून आंदोलन करत आहे. सकल धनगर समाज, खालापूर आणि हर हर चांगभले धनगर समाज, खालापूर यांनी भव्य रस्ता आंदोलन करून तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अण्णासाहेब बाचकर महाराज, रामचंद्र पुकळे, हरेश ढेबे, संतोष घाटे, भगवान ढेबे, संपत ढेबे, सुनील कोकळे, अक्षय चोपडे, ऋषिकेश वाघमोडे, जानू आखाडे आदी उपस्थित होते.