Blind Asia Cup : फायनल न खेळताच पाकिस्तानला ट्रॉफी दिल्याने पेटला वाद! आशिया चषकात भारतावर अन्याय, टीम इंडियाने सोडलं मैदान
Blind Asia Cup Controversy : भारत आणि पाकिस्तानच्या अंध क्रिकेट संघांमधील आशिया कप २०२६ चा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता, पण यानंतर अचानकपणे चषक पाकिस्तानला देण्यात आला.

Indian team walks out of Blind Asia Cup 2026 presentation : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रोमांचक असतो, मात्र ‘अंध आशिया चषक २०२६’च्या अंतिम सामन्यात चेंडू न टाकताच विजेतेपदाची ट्रॉफी पाकिस्तानला बहाल करण्यात आली. या धक्कादायक प्रकारानंतर आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत भारतीय संघाने बक्षीस वितरण समारंभावर बहिष्कार टाकत मैदान सोडले. सामना न खेळताच पाकिस्तानला विजेते घोषित केल्यामुळे क्रीडा विश्वात मोठा वाद निर्माण झाला आहे.
पावसामुळे अंतिम सामना पूर्णपणे रद्द –
ढाका येथे खेळवला जाणारा हा अंतिम सामना मुसळधार पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला आणि मैदानावर नाणेफेकही होऊ शकली नाही. यानंतर तांत्रिक समितीने नियमांनुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जागतिक अंध क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष सय्यद सुलतान शाह यांनी समितीचा हा निर्णय अचानक रद्दबातल ठरवला आणि पाकिस्तानला थेट चषक देऊन टाकला.
पाकिस्तानी अध्यक्षांच्या मनमानीवर गंभीर आरोप –
The trophy was awarded to Pakistan without the final being played.
WBCC President and Pakistan Blind Cricket Council President Sultan Shah overruled the WBCC Technical Committee’s decision to declare joint winners, forcing the match referee to announce the same decision. https://t.co/XHoRsSo48D
— Cricket Association for the Blind in India (CABI) (@blind_cricket) November 20, 2026
The trophy was awarded to Pakistan without the final being played.
WBCC President and Pakistan Blind Cricket Council President Sultan Shah overruled the WBCC Technical Committee’s decision to declare joint winners, forcing the match referee to announce the same decision. https://t.co/8xT35snNIv
— Cricket Association for the Blind in India (CABI) (@blind_cricket) November 20, 2026
सय्यद सुलतान शाह हे स्वतः पाकिस्तानचे नागरिक असल्यामुळे त्यांनी स्पर्धेच्या नियमांना बगल देऊन आपल्याच देशाला ट्रॉफी दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. गट फेरीत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी होता, हे कारण पुढे करत त्यांनी हा एकतर्फी निर्णय घेतला. त्यांच्या या पक्षपाती भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अंध क्रिकेट परिषदेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गट फेरीतील कामगिरी आणि भारताचा संताप –
Pakistan have been crowned champions of the Blind T20 Asia Cup after the final against India was abandoned due to persistent rain. The match referee declared Pakistan the winner, while the national team topped the tournament standings with victories in all three of their league matches.
— Muneeb Farrukh (@Muneeb313_) November 20, 2026
या स्पर्धेच्या गट फेरीत पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकले होते, ज्यात भारताविरुद्धचा शेवटच्या चेंडूवर १ गडी राखून मिळवलेला विजय समाविष्ट होता. दुसरीकडे, भारताने यजमान बांगलादेशचा पराभव करत थाटात अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात दोन्ही संघांना संधी न देता नियम धाब्यावर बसवून पाकिस्तानला विजेते ठरवल्याने संतापलेल्या भारतीय खेळाडूंनी सोहळ्यावर बहिष्कार टाकून आपला निषेध नोंदवला.





