Blast in Palghar : पालघरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
पालघर जिल्ह्यात (Blast in Palghar) मंगळवारी एका फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Blast in Palghar : पालघर जिल्ह्यात (Blast in Palghar) मंगळवारी एका फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृत व्यक्तींची ओळख भावेश वावरे (३५) आणि मोनिका पाडवले (३०) अशी पटली आहे. जखमींमध्ये मोनिका जाधव (३०), जागृती गवते (२७), प्रतिभा पवार (३०) आणि मोनिका वर्दी (२५) यांचा समावेश आहे.
माहितीनुसार, वाडा तालुक्यातील कोंसाई गावात असलेल्या एका जुन्या शेतघरातील (फार्महाऊस) पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात चालवल्या जाणाऱ्या फटाका निर्मिती केंद्रात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट (Blast in Palghar) झाला. स्फोटाच्या वेळी, प्रामुख्याने महिलांचा समावेश असलेले तब्बल ३५ कामगार तिथे फटाके बनवण्याच्या कामात मग्न होते.
रासायनिक मिश्रण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच हा स्फोट झाला. यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेला ९० टक्के भाजल्यामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू (Blast in Palghar) झाला. अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींना पुढील उपचारांसाठी भिवंडी उप-जिल्हा रुग्णालय आणि अन्य एका ठिकाणी हलवण्यात आले आहे.
अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्फोटानंतर भडकलेली आग अग्निशमन दलाने त्वरित आटोक्यात आणली. या कारखान्याकडे आवश्यक परवाने आणि सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
स्फोटानंतर कारखान्याची शेड कोसळली, ज्यामुळे त्याचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात विखुरले गेले. या शक्तिशाली स्फोटाच्या ठिकाणापासून काही अंतरावर मृतांचे अवयव आढळून आले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.






