Blair Tickner : धक्कादायक! न्यूझीलंडच्या खेळाडूला गंभीर दुखापत, क्षेत्ररक्षण करताना खांदाच निखळला

Blair Tickner dislocated shoulder : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका बसला आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भेदक गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले.
वेलिंग्टन येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत टिकनरने शानदार प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. मात्र, डावाच्या दरम्यान फाइन लेगवर क्षेत्ररक्षण करत असताना, चेंडू अडवण्यासाठी त्याने उडी मारली. यावेळी त्याचा डावा खांदा जमिनीवर जोरात आदळला आणि तो निखळला.
ब्लेअर टिकनरला गंभीर दुखापत –
🚨 𝗕𝗥𝗘𝗔𝗞𝗜𝗡𝗚 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
Blair Tickner had to be stretchered off the field after a suspected shoulder dislocation while fielding.
He earlier took 4 wickets, but his injury adds to New Zealand’s fast-bowling problems.
Home crowd showed support as he left the field.
— Gully Point (@gullypoint_) December 10, 2025
दुखापत इतकी गंभीर होती की, टिकनर मैदानावरच वेदनेने विव्हळत होता आणि त्याला हालचाल करता येत नव्हती. यानंतर किवी फिजिओ लगेच मैदानावर आले. खांदा निखळल्याचे स्पष्ट झाल्यावर, त्याला स्ट्रेचरवरून उचलून तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. ताज्या माहितीनुसार, तो अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
दुखापतीसोबत वैयक्तिक संघर्ष –
दोन वर्षांनंतर न्यूझीलंडच्या कसोटी संघात परतलेल्या टिकनरने (ज्याने यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना बाद केले आहे) या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या होते. मात्र, या गंभीर दुखापतीमुळे त्याला किमान तीन ते चार महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.
या दुखापतीमुळे टिकनरच्या अडचणी वाढल्या आहेत, कारण तो वैयक्तिक आयुष्यातही मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या वर्षी, त्याची पत्नी ब्लड कॅन्सरने त्रस्त असल्याचे निदान झाले, त्यावेळी ती गर्भवती होती. एका बाजूला पत्नीवर उपचार सुरू असताना, आता स्वतः टिकनरला ही मोठी दुखापत झाली आहे.
हेही वाचा – ICC ODI Rankings : किंग कोहलीची मोठी झेप; रोहित-विराटमध्ये ‘नंबर वन’ साठी चुरस!
सामन्याची स्थिती –
या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या २०५ धावांवर गुंडाळला. शाय होप (४८) आणि जॉन कॅम्पबेल (४४) यांनी सर्वाधिक धावा केल्या. ब्लेअर टिकनरने ४, तर मायकल रेने ३ विकेट्स घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने बिनबाद २४ धावा केल्या होत्या.





