Suhana Khan : सुहाना खानचा ग्लॅमरस लुक !

Suhana Khan| अभिनेता शाहरुख खान याच्यासह त्याची लेक सुहाना खानची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहानाने ‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. ती नेहमीच तिच्या स्टाईल आणि फॅशनने चाहत्यांची मने जिंकते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.
सध्या सुहाना खान परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथले तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये सुहाना खानने निळ्या रंगाचा शॉर्ट डेनिम ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेससोबत सुहानाने ट्रेंच कोट घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. सोबत सुहानाने काळ्या गॉगलसह तिचा लूक पूर्ण केला आहे. सुहानाने केसात एक छोटे पांढरे फूलही लावले आहे. सध्या तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
View this post on Instagram
अनेकांना सुहानाचा हा लुक पाहून ‘कभी खुशी कभी गम‘ चित्रपटातील POO ची आठवण येते. सुहानाचा लुक या चित्रपटातील लुक करीना कपूर सारखा असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. सुहाना खानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सुहाना खान ‘द आर्चीज’ मध्ये दिसली होती, जो तिचा डेब्यू चित्रपट होता. सुहानाच्या पुढील प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सुहाना तिचा पुढचा चित्रपट वडील शाहरुख खानसोबत करण्याची चर्चा सुरू आहे. Suhana Khan|
हेही वाचा:
“240 चे 275 कधी होतील, हे मोदी-शाह यांना कळणारही नाही”; संजय राऊतांचा इशारा





