Uttar Pradesh: उत्तर प्रदेशासाठी भाजपची रणनीती तयार? तब्बल 100 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता
Uttar Pradesh: पक्षांतर्गत झालेल्या सर्व्हेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यापूर्वी भाजपकडून मोठी रणनीती आखली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पक्षांतर्गत झालेल्या सर्व्हेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर आल्याने किमान १०० आमदारांची तिकिटे कापली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
२०२४ चा धडा लक्षात घेऊन भाजप यावेळी उमेदवारी वाटपात सावध पावले उचलणार आहे. ज्या आमदारांविरोधात मतदारसंघात अँटी-इन्कम्बन्सी आहे किंवा स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी टोकाचे मतभेद आहेत, अशा विद्यमान लोकप्रतिनिधींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या जागी तरुणांना, महिलांना आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
नव्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय
भाजपने उत्तर प्रदेशात घेतलेल्या काही अंतर्गत सर्व्हेमध्ये अनेक आमदारांचे रिपोर्ट कार्ड आणि कामगिरी अत्यंत खराब आढळली आहे. त्यांच्या मतदारसंघातील लोकांमध्ये त्यांच्याविरुद्ध नाराजी असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपकडून अंतर्गत सर्व्हे घेण्यात आला होता. विद्यमान १०० आमदारांच्या जागी आता नव्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमातून समोर आली आहे. Uttar Pradesh
भाजप बदल करण्याच्या तयारीत
भाजपचे १०० आमदार असे आहेत ज्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला आहे. याशिवाय, अनेक आमदारांचे स्थानिक अधिकाऱ्यांशी मतभेद आहेत. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेऊ शकतात असे बोलले जात आहे. याशिवाय सध्याचे वातावरण आणि Gen-Z वर सुरू असलेल्या चर्चेला सामोरे जाण्यासाठी पक्षाला काही बदल करायचे आहेत. जुन्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याऐवजी, पक्षाला नवीन आणि तरुण चेहऱ्यांना प्राधान्य द्यायचे आहे.
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांच्या आपापसातील गटबाजीला किंवा शिफारशींना थारा न देता, केवळ मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेल्या आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल, असा ठाम निर्णय हायकमांडने घेतला असल्याचे वृत्त समोर येत आहे. Uttar Pradesh
हेही वाचा:
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती





