Prithviraj Chavan : स्थानिक निवडणुका या महायुतीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. इतर पक्षातून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात इन्कमिंग सुरूच आहे. आता महायुतीतील मोठा भाऊ भाजपने पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मास्टस्ट्रोक टाकला आहे. यामुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यात येणारा कराडा तालुका हा काँग्रेसेचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला समजला जात होता. पण भाजपने येथे मोठी राजकीय खेळी करत हा मतदार संघ या विधानसेभेच्या निवडणुकीला आपल्याकडे आणला. कराड दक्षिण या विधानसभा मतदार संघातून भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले आमदार झाले. आता कराडच्या नगराध्यक्ष झालेल्या शारदा जाधव आपल्या हाती कमळ घेणार आहेत. हेही वाचा : satara news: काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांचा राजीनामा आपले सहकारी, आठ माजी नगरसेवकांसोबत त्या भाजपमध्ये दाखल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २८ अॅाक्टोबर रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय घडामोड माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धक्का देणारी मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून, आमदार डॅा. अतुल भोसले यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीतून भोसले यांनी राजकीय गणितं जुवळत कराड आणि मलकापूरचे माजी नगरसेवक, तसेच ग्रामीण भागातील काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपात दाखल झाले आहेत. आता पृथ्वीराज चव्हाण समर्थक कराडमधील जाधव गट भाजप प्रवेश करणार आहे. यामुळे आता या भागात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. कोण आहेत शारदा जाधव? शारदा जाधव या दोन वेळा कराडच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. दिवंगत सासरे ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले. त्यांचे दीर दिवंगत जयवंतराव जाधव हे देखील नगराध्यक्ष होते. १९९१-९५ चा अपवाद वगळता १९८५ पासून ४० वर्षे शारदा जाधव या कराड नगरपालिकेत नगरसेविका आहेत. हेही वाचा : Pune : आचारसंहितेपूर्वी कामांसाठी शासनाची घाई