शिंदे गटाला भाजपकडून ‘दे धक्का’? ; थेट ठाण्यात जाऊन गणेश नाईकांचे उपमुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले,”‘ओन्ली कमळ’…”

Ganesh Naik on Shinde group । विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत काही आलबेल असल्याचे दिसत नाही. वरवर जरी सगळं ठीक वाटत असले तरी तिन्ही पक्षात अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी आता चक्क ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचा चर्चांना उधाण आले आहे.
याविषयी बोलताना गणेश नाईक यांनी,”मी गडकरी रंगायतनमध्ये जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार भरवणार असल्याचे म्हटले आहे. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याची घोषणा ठाण्यात राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली.
भारतीय जनता युवा मोर्चा कोपरी मंडळ ठाणे द्वारे, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व कोपरी पाचपाखाडी चे विधानसभा प्रभारी श्री. भरत जी चव्हाण व भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सचिव श्री. ओमकार जी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्यमान कार्ड वितरण तसेच वॉकिंग… pic.twitter.com/4InN7lZkYL
— Ganesh Naik (@NaikSpeaks) January 28, 2025
ठाण्यात येत्या निवडणुकीत ‘ओन्ली कमळ’ फुलवायचेय Ganesh Naik on Shinde group ।
दरम्यान , यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी,”ठाण्यामध्ये येत्या निवडणुकीत ‘ओन्ली कमळ’ फुलवायचे आहे. शहरातील भाजप नेत्यांची तीच इच्छा आहे, असे सांगत पक्षाने ठाण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. तेव्हा ठाणे सुरळीत करण्याचे कामही माझेच असल्याचे मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले. त्यामुळे एकप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यात आगामी पालिका निवडणुकांमध्ये महायुतीत जोरदार कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिंदेकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही Ganesh Naik on Shinde group ।
गणेश नाईक यांच्या या विधानावर सध्या शिवसेनेची प्रतिक्रिया आलेली नसली तरी नवीन सरकार आल्यापासून एकनाथ शिंदेंची एकूणच नाराजी लक्षात घेता हा वाद देखील मोठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्याच्या निमित्ताने ठाणे कोपरी मंडल भाजप युवामोर्च्याच्यावतीने नाईक यांचा भव्य नागरी सत्कार कोपरीत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा कार्यक्रम देखील एकनाथ शिंदे यांच्याच मतदारसंघात पार पडला.





