राज्यपालांनंतर भाजप प्रवक्ते त्रिवेदींचं शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य,’ छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाची माफी मागितली’

मुंबई – काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेला वाद आणखी अनेक वादांना तोंड देत आहे. राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारला लिहिलेले पत्र दाखवून सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचे सांगितले. महाराष्ट्रात हा वाद पेटत राहिला. भाजप, शिंदे गट आणि मनसेने त्याचा निषेध केला. राहुल यांनी शुक्रवार आणि शनिवारी सावरकरांवर बोलणे टाळले. पण आता भाजप नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले आहेत की,’छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती.’
छत्रपति शिवाजी महाराज की तुलना माफ़ीवीर सावरकर से कर के @SudhanshuTrived ने शिवाजी महाराज का अपमान किया है।
जब तक सुधांशु जी सार्वजनिक माफ़ी नहीं माँगेंगे, कांग्रेस पार्टी ऐसी किसी भी डिबेट में हिस्सा नहीं लेगी, जिसमें सुधांशु जी की मौजूदगी रहेगी pic.twitter.com/qij3CsNSO7— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) November 19, 2022
सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रेही लिहिली होती. त्यावेळी अनेकजण राजकीय अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत. या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. असा दावा करणारे भाजपचे प्रवक्ते वेडे असावेत, असे ट्विट त्यांनी केले आहे.’
सुधांशू त्रिवेदी वृत्तवाहिनीच्या टीव्ही डिबेटमध्ये सहभागी झाले होते. नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर चर्चा सुरू होती. यावेळी भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही विनायक सावरकर यांच्यासोबत केली. सुधांशु त्रिवेदी यांच्या या डिबेटमधील शिवाजी महाराजांवरील विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
सुधांशु त्रिवेदी म्हणाले, ‘राहुल गांधी म्हणाले की वीर सावरकर यांनी माफी मागितली आहे. मात्र, माफीनाम्यावर बोलायचं झालं तर, त्याकाळी सुटका होण्यासाठी अनेक जण माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगाजेबाला ५ वेळ पत्र लिहून माफी मागितली’.





