भाजपवर साधला निशाणा,’दिल्ली’समोर झुकणार नाही, शरद पवार कडाडले’

Updated On:

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विस्तारित कार्य समितीच्या बैठकीचे उद्घाटन वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाजपवर टीकास्त्र सोडले.

यावेळी ते बोलतांना म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, दिल्ली समोर झुकणार नाही.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याचा कानमंत्र दिला.

दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या उद्घाटनपर भाषणात शरद पवार यांनी देशातील विविध घटकांच्या समस्यांचा परामर्श घेतला. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडे यंदा देण्यात आली आहे.

या अधिवेशनाचे आयोजन युवावर्ग करत असून विविध राज्यातील युवा प्रतिनिधींना अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातून अधिवेशनासाठी आलेल्या या सर्व युवा पदाधिकाऱ्यांचे पवार यांनी स्वागत केले.

देश कोणत्या दिशेने चालला आहे याची माहिती देताना पवार यांनी केंद्रीय सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. देशातील बळीराजावर झालेला अन्याय, अत्याचार, तरूणांवर ओढवलेले बेरोजगारीचे संकट, महिलांवरील वाढते अत्याचार याबाबत चिंता व्यक्त करत पवार यांनी पक्षातर्फे याबाबत एक ठोस कार्यक्रम हाती घेण्यात यावा, असे आवाहान केले.

आणखी संबंधित बातम्या

Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत

2026-10-08 17:22:34

Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

2026-10-08 16:00:09

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं