आरएसएसने अचानक भाजपवर टीका का केली ? ‘या’ नेत्याने सांगितले, ‘कारण’…

BJP-RSS Tension । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (आरएसएस) मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत आहे. जनतेने जनादेश दिला आहे, त्यानुसार सर्व काही होईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. याचा प्राधान्याने विचार करावा लागेल. वर्षभर मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून तो आता थांबवण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले आहे.
यावर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. अशात आता आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले सौरभ भारद्वाज…
‘भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) दोन्ही पक्ष एक आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चेहरा वाचवण्यासाठी आरएसएस भाजपवर हल्ला करत आहे. निवडणुकी पूर्वी या लोकांना भाजपला विजयी करून संविधान बदलायचे होते.
त्यांनी पुढे आपले मत मांडतांना सांगितले, ‘मला वाटतं की आरएसएसचाच गैरसमज झाला आहे. त्यांना वाटू लागलं आहे की इथली एक अशी शक्ती आहे, जी सर्व पक्षांना ज्ञान देऊ शकते. निवडणुकीपूर्वी हे लोक कुठे होते. निवडणुकीपूर्वी हे का सांगितलं गेलं नाही, कारण त्यावेळी त्यांनी भाजपला विजयी करून संविधान बदलण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा आरएसएसचा संपूर्ण अजेंडा देशासमोर आला.’
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर आता आरएसएस आणि भाजप एकमेकांवर फोडत आहे. मी देशाला सांगू इच्छितो की, आरएसएस आणि भाजप एकच आहेत. लक्ष वळवण्यासाठी हे केले जात आहे. हे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आहे. जर त्यांचा हेतू स्पष्ट असेल तर. तेव्हा त्यांनी निवडणुकीपूर्वी हे विधान केले असते जेणेकरून लोकांचे डोळे उघडले असते. ‘





