BJP Politics : राजकारणात मोठी खळबळ ! भाजपकडून संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त
मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पोटनिवडणुकीत (BJP Politics) भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी विजय मिळवला.

BJP Politics : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पोटनिवडणुकीत (BJP Politics) भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी विजय मिळवला.
या पराभवानंतर भाजपने थेट दतिया जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही संघटनात्मक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर प्रदेश पातळीवरील सर्व पदे रद्द केली आहेत.
दतियात काँग्रेसचा दणदणीत विजय
दतिया मतदारसंघातून भाजपने आशुतोष तिवारी यांना, तर काँग्रेसने घनश्याम सिंह यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले होते. या लढतीत काँग्रेसचे घनश्याम सिंह यांनी ६,०२९ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. या पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली आहे.
भाजपकडून संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर (BJP Politics) मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपने कडक पाऊल उचलत दतिया जिल्हा कार्यकारिणी तात्काळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, पराभवाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दोन सदस्यीय उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या समितीत प्रदेश संघटन महामंत्री गौरव रणदीवे आणि वरिष्ठ नेते अंबाराम कराडा यांचा समावेश होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपचे पराभूत उमेदवार आशुतोष तिवारी यांनी पक्षातीलच काही नेत्यांवर अंतर्गत विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग वरिष्ठ नेत्यांसमोर सादर केल्याचे समजते.
काँग्रेसमध्येही संघटनात्मक फेरबदल
दुसरीकडे, विजयानंतर मध्य प्रदेश काँग्रेसमध्येही (BJP Politics) संघटनात्मक पातळीवर मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) निर्देशानुसार प्रदेश काँग्रेस कमिटीतील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांची पदे रद्द करण्यात आली आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी यांनी ५ ऑगस्ट रोजी अधिकृत पत्र जारी करून संघटन मजबूत करण्यासाठी ही पुनर्रचना केली जात असल्याचे स्पष्ट केले.
या निर्णयाची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी आणि विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांना देण्यात आली आहे. लवकरच मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये नवीन विभाग, नवे पदाधिकारी आणि नव्या कार्यकारिणीची घोषणा केली जाणार आहे.






