BJP on mamata banrjee। पश्चिम बंगालच्या संदेशखलीमध्ये तणावाची परिस्थिती दिसून येतीय. भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांना संदेशखलीचा दौरा करण्यापासून रोखण्यात आलंय. यावरुन आता पश्चिम बंगालच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका केलीय. “इस्रायलमध्ये हमासने जे केले, ते पश्चिम बंगालमध्ये होत आहे.” अशी खरमरीत टीका त्यांनी केलीय. इस्रायलमध्ये हमासने जे केले, तेच आज पश्चिम बंगालमध्ये होतंय BJP on mamata banrjee। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आता ममता दीदी म्हणणे सोडून दिले पाहीजे, त्या आता काकू झाल्या आहेत. मी त्यांचा नंदीग्राम विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. तेव्हा त्यांनी माझ्याविरोधात ४२ खटले दाखल केले होते. इस्रायलमध्ये हमासने जे केले, तेच आज पश्चिम बंगालमध्ये होत आहे. ममता बॅनर्जी किम जोंग उनचं भारतातील छोटं रुप BJP on mamata banrjee। सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, यापुढे पश्चिम बंगालमध्ये डबल इंजिनचे सरकार स्थापन होईल. यासाठी अधिकारी यांनी एक घोषणा दिली. “संदेशखली, ममता की कुर्सी करेगी खाली”, अशी घोषणा देताना अधिकारी म्हणाले की, ममता बॅनर्जी या किम जोंग उनचं भारतातील छोटं रुप आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्या घोषणा बांगलादेशमधून येतात, अशीही टीका त्यांनी केली. भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार हेदेखील जेएनयू मधील कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनीही मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ममता बॅनर्जी आणि भारतविरोधी घटकांचा खोलवर संबंध असल्याचे ते म्हणाले. संदेशखली मधील महिलांच्या प्रतिक्रियेचा हवाला देऊन सुकांता मजुमदार म्हणाले की, शेख शहाजानने हिंदू महिलांवर अत्याचार केले. तो जानेवारी महिन्यापासून बेपत्ता आहे. फक्त पश्चिम बंगालमधील पोलिसांनाच त्याचा ठावठिकाणा माहीत आहे. इस्रायल किंवा पॅलेस्टाईनमध्ये एखादा हल्ला झाला की, भारतात निदर्शने केली जातात. पण आता पश्चिम बंगालच्या परिस्थितीबाबत हेच लोक शांत का बसले आहेत? असाही सवाल मुजूमदार यांनी उपस्थित केला.