Priyanka Gandhi: भाजप खासदाराने प्रियंका गांधींना भेट दिली ‘1984’ लिहिलेली बॅग; पाहा व्हीडिओ

Aparajita Sarangi Gifts Bag To Priyanka Gandhi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘बॅग पॉलिटिक्स’ची विशेष चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा या अधिवेशनात विशेष चर्चेत राहिल्या. खासदार झाल्यानंतर त्यांनी संसदेत पहिल्यांदाच केलेले भाषण देखील विशेष गाजले. याशिवाय, पॅलेस्टाईन आणि बांगलादेश लिहिलेल्या त्यांच्या बॅग्स देखील चर्चेत राहिल्या. त्यातच आता भाजप खासदाराने थेट ‘1984’ उल्लेख असलेली बॅग प्रियंका गांधी वाड्रा यांना भेट दिली आहे.
प्रियंका गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘पॅलेस्टाईन’ अशी अक्षरे लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या होत्या. पॅलेस्टाईन नागरिकांच्या समर्थनार्थ त्यांनी ही कृती केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ‘बांगलादेश’ अशी अक्षरे लिहिलेली बॅग घेऊन संसदेत पोहोचल्या. त्यांच्या या बॅग पॉलिटिक्सची विशेष चर्चा रंगली होती. यावरून भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता.
आता भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी ‘1984’ असे लिहिलेली बॅग प्रियंका गांधींना दिली. बॅगवरील 1984 हा आकडा रक्ताने माखलेला दाखवला आहे. अपराजिता सारंगी यांनी ही बॅग देत शिख विरोधी दंगलीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे प्रियंका गांधींनी या बॅगचा स्विकार देखील केला.
A Perfect gift to Priyanka Gandhi 🔥🔥
BJP MP Aparajita Sarangi responded to Priyanka Gandhi’s actions in Parliament by giving her a bag with “1984” written on it.
Priyanka Gandhi please pose with this bag and support the victims of 1984 riots. pic.twitter.com/IUHzZlLTbR
— The Delhi Dialogues (@DelhiDialogues6) December 20, 2024
यावेळी बोलताना अपराजिता सारंगी म्हणाल्या की, देशातील जनतेने वारंवार काँग्रेसला नाकारले आहे. अमित शाहांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा कोणताच मुद्दा नाही. काँग्रेसचे कारनामे लक्षात आणून देण्यासाठी त्यांना ही बॅग दिली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. विरोधी पक्षांकडून अमित शाह यांच्या माफीची मागणी करत संसदेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.





