BJP MLC Candidate List : मोठी बातमी..! विधानपरिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; ‘या’ दिग्गज नेत्यांना संधी
BJP MLC Candidate List : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे.

BJP MLC Candidate List : राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ११ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. (BJP MLC Candidate Lis)
या यादीतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (BJP MLC Candidate Lis)
भाजपने अधिकृत पत्रकाद्वारे उमेदवारांची नावे जाहीर केली असून, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीच्या जागावाटपानुसार भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. (BJP MLC Candidate Lis)
हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण लखानी
भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर
अमरावती – प्रविण पोटे पाटील
सांगली-सातारा – धैर्यशील कदम
सोलापूर – राजेंद्र राऊत
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील
जळगाव – नंदकिशोर महाजन
नागपूर – डॉ.राजीव पोतदार
Here you go-list of candidates from @BJP4Maharashtra is out for MLC polls https://t.co/9Attx47eu9 pic.twitter.com/GKsEMu9aXM
— 🦏 Payal M/પાયલ મેહતા/ पायल मेहता/ পাযেল মেহতা (@payalmehta100) May 31, 2026
प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीमुळे अहिल्यानगरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिले असून, त्यांचा जिल्ह्यातील राजकीय प्रभाव लक्षात घेता भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. (BJP MLC Candidate Lis)
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी उमेदवार निश्चिती आणि राजकीय रणनीतींना वेग आला असून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (BJP MLC Candidate Lis)





