हिंगोली : राज्यात येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरुवात करण्यात आली आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंगोलीचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांची तब्येत खालावल्याचे समोर आले आहे. त्यांना तातडीने एअर ॲम्बुलन्सने मुंबई इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांना मागील काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होता. तसंच मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील एका खाजगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना हिंगोलीला पाठवण्यात आले होते. मात्र आज त्यांची पुन्हा तब्येत खालवल्याने त्यांना तात्काळ हिंगोली येथून नांदेड विमानतळ आणि आणि तिथून एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात आलं आहे. मात्र त्यांना कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे अद्याप समोर आलेले नाही.