BJP MLA : ‘फटाके फोडल्याने आजार बरे होतात’; भाजप आमदाराच्या अजब विधानाने संताप
BJP MLA : दिवाळीनंतर देशातील अनेक शहरांमध्ये फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि आरोग्यावरील दुष्परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच पश्चिम बंगालमधील भाजप आमदार पापिया अधिकारी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

BJP MLA : दिवाळीनंतर देशातील अनेक शहरांमध्ये फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि आरोग्यावरील दुष्परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच पश्चिम बंगालमधील भाजप आमदार पापिया अधिकारी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (BJP MLA)
फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होण्यास मदत होते, अशा आशयाचं विधान त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या विधानावर सोशल मीडियातून टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागत आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. (BJP MLA)
नेमकं काय म्हणाल्या भाजप आमदार?
पापिया अधिकारी या टॉलीगंज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या एका कालीपूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी गेल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होण्यास मदत मिळते, असं विधान केलं. (BJP MLA)
तसेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीही फटाके फोडण्याबाबत भूमिका मांडल्याचा उल्लेख त्यांनी केला. कालीपूजा फटाक्यांशिवाय कशी पूर्ण होणार? आम्ही फटाके फोडणारच; मात्र पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करू, असंही त्या म्हणाल्या. (BJP MLA)
टीकेनंतर आमदारांनी मागितली माफी
या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. वाढता विरोध लक्षात घेऊन पापिया अधिकारी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं.
दिवाळी हा प्रकाशाचा आणि दिवे लावण्याचा सण आहे. वाईट गोष्टी नष्ट व्हाव्यात, हा या उत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण माफी मागतो. आपलं विधान मागे घेण्यास तयार असून ते मागे घेतलं असंच समजा, असं त्यांनी स्पष्ट केलं. (BJP MLA)
२०२६ च्या निवडणुकीत मिळवला विजय
पापिया अधिकारी यांनी २०२१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी टॉलीगंज मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे नेते अरूप बिस्वास यांचा पराभव करत विजय मिळवला होता. (BJP MLA)





