VidhanSabhaElection: भाजप आघाडी सरकारला पाजणार ‘#रम्याचेडोस’

मुंबई: विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचाराला सुरवात केली आहे. सोशल मीडियावर एकमेकांवर टीका, सध्या सुरु असलेल्या जाहीर राजकीय सभा यामधून हे स्पष्ट होते. भाजपने आघाडी सरकारला घेरण्यासाठी नवी शकलं लढवली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

आघाडी सरकार व त्यांच्या मित्र पक्षांवर असलेल्या प्रेमाची उजळणी करण्यासाठी ‘‘ च्या माध्यमातून ते विरोधकांवर टीका करणार आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्याप्रकारे ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे हत्यार राज ठाकरेंनी उपसले होते. ‘रम्याचे डोस’ हा त्यातलाच प्रकार असल्याची चर्चा सोशल माध्यमांवर आहे.

नमस्कार मंडळी,
तुम्हा-आम्हापैकी एक असलेला रमेश उर्फ ‘रम्या’ पुढील काही दिवस आघाडी सरकार व त्यांच्या मित्र पक्षांवर असलेल्या प्रेमाची उजळणी करणार आहे. आपल्या प्रेमाचे डोस पाजण्यासाठी ‘#रम्याचेडोस‘ च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे.

नक्की वाचा!@NCPspeaks@INCMaharashtra pic.twitter.com/oZy8rfxcaK

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 20, 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)