भाजप खुषीत; चार राज्यांत मतांच्या टक्केवारीत वाढ; उत्तराखंडमध्ये घटला टक्का

नवी दिल्ली -भाजपच्या दृष्टीने विधानसभा निवडणुकांचे निकाल सुखावणारे ठरले आहेत. त्या निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या पाचपैकी चार राज्यांत वाढलेली मतांची टक्केवारी भाजपला आणखीच खुष करणारी आहे.
उत्तरप्रदेशात मागील निवडणुकीत (2017) भाजपला 39.67 टक्के मिळाली. यावेळी ते प्रमाण 41.80 टक्के इतके आहे. गोव्यातील भाजपच्या मतांचे प्रमाण वाढून 32.50 टक्क्यांवरून 33 टक्क्यांवर गेले आहे. त्या पक्षाला मणिपूरमध्ये मागील वेळी 36 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. त्यामध्ये यावेळी एक टक्क्याने वाढ झाली.
पंजाबमध्ये यावेळी भाजपला 6.60 टक्के मते मिळाली. मागील वेळी ते प्रमाण 5.40 टक्के इतके होते. उत्तराखंडमध्ये मात्र भाजपच्या मतांचा टक्का कमी झाला आहे. त्या राज्यात मागील वेळी भाजपने 46.50 टक्के मते मिळवली होती. यावेळी ते प्रमाण 44.30 टक्के इतके आहे. भाजपच्या उलट कॉंग्रेसची स्थिती आहे. कॉंग्रेसच्या मतांचे प्रमाण उत्तराखंडमध्ये वाढले. मात्र, इतर राज्यांत कमी झाले.





