करुणा शर्मा प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Updated On:

नागपूर – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली.
त्यानंतर त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचं कारण नाही. पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर मिळालेली पिस्तुल हे गंभीर आहे. कोणत्याही दबावाशिवाय करुणा शर्मा पिस्तुल प्रकऱणाची चौकशी झाली पाहिजे. असी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.





