ओरिसा विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

भुवनेश्वर – लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. सध्या ओरिसात बिजू जनता दलाचे सरकार आहे ज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. राज्य विधानसभेत १४६ सदस्य आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीने सर्वाधिक ११२ जागा जिंकल्या आहेत. यानंतर भाजपने२३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसचे नऊ आणि सीपीएमचे एक आमदार विजयी झाले. याशिवाय एक अपक्षही विजयी झाला. (BJP candidates for Orissa Assembly announced)
एकीकडे भारतीय जनता पक्ष लोकसभेसाठी ३७० आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी ४०० हूननाधिक जागांचे लक्ष्य ठेवून काम करत आहेत. त्याचप्रमाणे ओरिसामध्येही डबल इंजिन सरकार कसे राहील, याविषयीची रणनीती आखत आहे. दोन्ही निवडणुकांसाठी पक्ष जिंकण्याची झमता असलेले उमेदवार हाच एकमेव निकष लावत असून बिजू जनता दलाशी टक्कर घेताना आता पक्षाला पूर्ण बहुमताची अपेक्षा आहे.
पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आणि ओरिसा भाजपा प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल, विरोधी पक्षनेते जयनारायण मिश्रा हे एकमेकांशी सातत्याने संपर्कात असून राज्यात भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार आणण्यासाठी पक्ष प्रयत्नशीललासल्याचे सामल यांनी सांगितले आहे.





