सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीवर भाजप आक्रमक; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Updated On:

पुणे – भाजपनेते किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्यावर अनेकदा स्वपक्षातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यातच आज सोमय्या यांना पुण्यात शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पायाखालची वाळू घसरली की माणूस बेफाम होतो. मुद्दे संपले की, गुद्द्यावर येतात. सभ्यतेचा बुरखा फाटला आहे. भावना गवळी यांच्यावेळी देखील तेच केलं. हसन मुश्रीफांच्या वेळी तेच झालं. पण सोमय्या घरी बसले नाही.

दरम्यान संपूर्ण गदारोळात सोमय्या खाली पडले. त्यात ते जखमी झाले आहे. त्यामुळे त्यांना संचेती रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं.  थोड्या वेळाने सर्व कळेल. मात्र आम्ही काही बांगड्या भरल्या नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. तसेच जशाच तस उत्तरही दिलं जाईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत जमले होते. मात्र सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारात येणार असल्याची माहिती मिळताच सर्व शिवसैनिक नव्या इमारती समोर गेले.

सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराने आले. त्यानंतर जुन्या प्रवेशद्वारात असलेल्या शिवसैनिकांनी त्यांना पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढा अशी मागणी करत त्यांना अडविले. त्यानंतर सोमय्या त्यांना भेटले. मात्र सोमय्या नवीन इमारतीत आल्याचे कळताच सर्व शिवसैनिक प्रवेशद्वारात आले आणि त्यांनी त्याची वाट अडविली.


त्यानंतर काही समजण्याच्या आताच धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर एवढा गोंधळ झाली की सोमय्या यांचे सुरक्षा रक्षक बाजूला फेकले गेले. त्यानंतर सोमय्या यांना धक्काबुक्की करुन खाली पाडले  आणि मारहाण करण्यात आली. तसेच गाडीवर लाथा बुक्क्या मारण्यात आल्या.

आणखी संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी खुशखबर; पहिल्यांदाच धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक पाहा

2026-09-09 18:49:09

Ganeshotsav 2026 : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी खुशखबर; पहिल्यांदाच धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक पाहा

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

2026-09-09 17:46:05

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

coaching classes: प्रस्‍तावित कायद्याला नाही, जाचक अटींना विरोध

2026-09-09 07:52:42

coaching classes: प्रस्‍तावित कायद्याला नाही, जाचक अटींना विरोध

PMRDA: पीएमआरडीएला टाळे ठोकण्याची वेळ

2026-09-09 07:48:08

PMRDA: पीएमआरडीएला टाळे ठोकण्याची वेळ

Purandar Airport: महिनाअखेरपर्यंत ८० टक्के जमिनीचा ताबा

2026-09-09 07:44:15

Purandar Airport: महिनाअखेरपर्यंत ८० टक्के जमिनीचा ताबा