Bird flu : ब्राझीलमध्ये बर्ड फ्लूची साथ

सॅन पावो (ब्राझील) : ब्राझीलमध्ये बर्ड प्लू रोगाची साथ पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुक्कुट पालन क्षेत्रात सर्वात जास्त उत्पादन आणि निर्यात असलेल्या ब्राझीलमध्ये बर्ड फ्लूचे पहिले प्रकरण सापडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ गार्डन डो सुल येथे बर्ड फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे कृषी मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
या प्रादुर्भावामुळे आपत्कालिन उपाययोजना लागू केल्या जात असून रोगाला नष्ट करण्याबरोबर कृषी उत्पादनांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे. कृषी उत्पादनामुळे देशाची अन्न सुरक्षा जपली जाणार आहे. त्याची काळजी घेतली जाणार असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. जागतिक प्राणी आरोग्य संघटना, आरोग्य आणि पर्यावरण मंत्रालये आणि ब्राझीलच्या व्यापारी भागीदारांना याची सूचना दिली असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.
चीन आणि युरोपियन युनियनने व्यापार करारानंतर ब्राझीलमधून पोल्ट्री आयात थांबवली आहे. जपान, सौदी अरेबिया, युएई आणि फिलीपिन्स सारख्या देशांनी आधीच हा प्रादेशिक दृष्टिकोन स्वीकारला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. ब्राझील हा जगातील आघाडीच्या पोल्ट्री उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक आहे. ब्राझीलमध्ये जागतिक कुक्कुट उत्पादनातील १४ टक्के उत्पादन होते, असे अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हटले आहे.





