बिपीम रावत : लष्करी परंपरेतील लढवय्या

भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख होण्याचा मान मिळवणाऱ्या बिपीम लक्ष्मणसिंह रावत यांवा जन्म 16 मार्च 1958 ला झअला होता. तिन्ही संरक्षण दलामवरील सर्वोच्च प्रमुखपदी त्यांची नियुक्ती 30 डिसेंबर 2019 ला करण्यात आली होती. ते कर्मचारी समितीचे 57वे आणि अखेरचे प्रमुख होते. त्यांनी 26 वे लष्कर प्रमुख म्हणूनही कार्यभार सांभाळला.
हिंदु गढवाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या अनेक पिढ्या भारतीय लष्करी दलामध्ये कार्यरत होत्या. त्याचे वडील भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते. रावत यांचे शिक्षण डेहराडून येथील कॅमब्रीन हॉल स्कूल आणि सिमला येथील एडवर्ड स्कूलमध्ये झाले. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि डेहराडूनच्या भारतीय लष्करी अकादमीत त्यांनी लष्करी शिक्षण घेतले. त्यांनी या शिक्षणात “स्वोर्ड ऑफ हॉनर’ पटकावली.
रावत यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हीस स्टाफ कॉलेजमधून पदवीचे शिक्षणही घेतले. अमेरिकेच्या आर्मी कमांडमधून आणि कान येथील जनरल स्टाफ कॉलेजमधून त्यांनी लष्कराचे पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले होते.
मद्रास विद्यापीठातून त्यांनी संरक्षण अभ्यास या विषयातील एम. फिल मिळवली होती. तेथेच त्यांनी व्यवस्थापन आणि कंप्युटर स्टडीजच्या पदविका मिळवल्या. मिरत येथील चौधरी चरणसिंह विद्यापीठाने त्यांना मिलिटरी मिडिया स्ट्रॅटेजिक स्टडीज या विषयातील अभ्यासाबद्दल त्यांना पीएचडी प्रदान केली.
त्यांच्या लष्करी सेवेची सुरवात त्यांचे वडील कार्यरत असणाऱ्या 11 गुरखा रायफल्समधून झाली. तेथे त्यांनी अती उंचावरील युध्दाचा अनुभव घेतला. त्यांनी घुसखोरी रोखण्याच्या अनेक मोहिमांचे नेतृत्व त्याकाळात केले.
काश्मिरातील उरी येथे त्यांनी कंपनीचे नेतृत्व मेजर म्हणून केले. 11 गुरखअ रायफल्सच्या पाचव्या बटालीयनचे नेतृत्व कर्नल म्हणून केले. इशान्य भारताच्या सीमेवर त्यांनी कोबिथु येथे ते कार्यरत होते. त्यांनंतर त्यांना ब्रिगेडियर म्हणून पदोन्नती देत राष्ट्रीय रायफल्सच्या पाचव्या विभागाचे नेतृत्व देण्यात आले.
कोंगोमध्ये त्यांनी चॅप्टर 7 मोहिमेत बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले. मेजर जनरल म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी उरीमध्ये पायदळाच्या 19 व्या तुकडीचे उरीत नेतृत्व स्वीकारले. लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये त्यांनी अध्यापनही केले होते. पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुखपद स्वीकारण्यापुर्वी दिमापूर येथे थर्ड क्रॉपचे ते प्रमुख होते. एक जानेवारी 2016 ला त्यांनी दक्षिण विभागाचे प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी लष्करप्रमुख म्हणून 1 सप्टेंबर 2016 मध्ये कार्यभार स्वीकारला.
बारत सरकारने त्यांची 27 वे लष्करप्रमुख म्हणून 17 डिसेंबर 2016 ला नियुक्ती केली. फिल्ड मार्शल सॅम माणकेशॉ आणि जनरल दलबीर सिंग सुहाग यांच्यानंतर गुरखा ब्रिगेडमधून झालेले ते तिसरे लष्कर प्रमुख होते. नेपाळच्या लष्कराचे मानदप्रमुखपद त्यांना देण्यात आले होते.
भारत आणि चीनमध्ये 1987 मध्ये झालेल्या संघर्षावेळी रावत यांच्या नेतृत्वाखालील बटालीयन चिन्यांच्या पिपल्स लिबरेशन आर्मीपूढे ठामपणे उभी होती. 2015 मध्ये युएनएलएफडब्ल्यूच्या दहशतवाद्यांनी 18 जवानांची हत्या केली होती. त्यावेळी दीमापूर येथील थर्ड कॉर्पमधून 21जणांचे पथक रावत यांच्या नेतृत्वाखाली पॅराशूटने उतरवून म्यानमारमधील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला होता.





