Bike Taxi: मुंबईत लवकरच सुरू होणार बाइक टॅक्सी; सरकारकडून मिळाला ग्रीन सिग्नल

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक कोंडी हि सध्या एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे टॅक्सी असो किंवा रिक्षाने प्रवास करत असताना लोकांना तासंतास वाहतुकीत अडकून राहावं लागतं. पण आता दिल्लीच्या धर्तीवर महायुती सरकार रॅपिडो सारखी बाइकची टॅक्सी सेवा मुंबईत सुरु करणार आहे. पुढील दोन महिन्यात बाइक टॅक्सी रस्तावर दिसेल अशी माहिती पहिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
महिलांची विशेष काळजी
मुंबईत पुढच्या २ महिन्यात रॅपिडो सारख्या बाइक सर्विस मुंबईत सुरू होणार आहे. बाईक टॅक्सी सुरू करतांना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे बसलेल्या महिला प्रवाशांसाठी बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असणार आहे. ओला, उबेर या खासगी कार सेवेप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
बाइक टॅक्सी सेवा कशासाठी?
राज्य सरकारने मुंबई आणि पुण्यात रॅपिडो बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाइक टॅक्सीमुळे तरुणांना रोजगार मिळेल, असा उद्देश सरकारचा आहे. तसेच महिलांनासुद्धा यातून रोजगार मिळेल.
सरकारने घातल्या ‘या’ अटी
राज्य सरकार बाइक टॅक्सीला परवानगी तर देत आहे पण त्यांनी यासाठी काही नियम व अटी घातल्या आहेत.
1) जर एखाद्या महिल्या प्रवाशाला मागे बसवणार असेल तर चालक आणि प्रवाशांमध्ये अंतर असण्यासाठी पार्टीशन लावावे लागणार आहे.
2) एवढंच नाहीतर प्रवाशांने बाइक टॅक्सी बूक केल्यानंतर 10 मिनिटांमध्ये बाइक टॅक्सीचा चालक पोहोचला नाहीतर संबंधित चालकाला 100 रुपये दंड द्यावा लागणार आहे. हे पैसे त्याला प्रवाशाला द्यावे लागतील.
3) विमानतळ, रेल्वे स्टेशन, रुग्णालयाच्या परिसरात जर बाइक टॅक्सी चालकाने टॅक्सी बुकिंग रद्द केली तर त्याला पाच पट दंड भरावा लागणार आहे.





