पिंपरी | गतीरोधकाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी
Updated On:

देहूरोड, (वार्ताहर) – भरधाव दुचाकी चालवत असताना गतीरोधकाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 23 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास देहूरोड ते येलवाडी मार्गावर चिंचोली येथे घडली.
अनिकेत अरुण घोडके (वय 31, रा. येलवाडी, देहूगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत घोडके हे 23 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास देहूरोड येथून येलवाडी येथे दुचाकीवरून जात होते.
चिंचोली येथे आल्यानंतर अनिकेत यांना गतीरोधकाचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला





