पिंपरी | रावेतमध्ये रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – रिक्षाने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 18) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास लंडन ब्रीज रावेत येथे घडला.
सागर संभाजी शिंदे (वय 24, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालक अर्जुन नामदेव मोरे (वय 25, रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरून रावेत येथून मुकाई चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी आरोपी त्याच्यात ताब्यातील रिक्षा भरधाव चालवत आला.
त्याने रिक्षाने शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात शिंदे यांच्या हाताला दुखापत झाली. तसेच त्यांना शरीराला ठिकठिकाणी मुक्कामार लागला.





