बिहार विधानसभा सभागृहात पुन्हा ‘SIR’ चा मुद्दा उपस्थित ; तेजस्वी यादव म्हणाले,’नितीश कुमार यांनी खात्री…’

Bihar Vidhan Sabha Monsoon Session। बिहार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी सभापती नंद किशोर यांना, “काल एसआयआरवरील चर्चा अपूर्ण राहिल्याने आज पुन्हा त्यावर चर्चा झाली पाहिजे.” अशी मागणी केली. तसेच तेजस्वी यादव पुढे,”काल सभागृहात जे काही घडले ते योग्य नव्हते. आपल्या राज्याची प्रगती व्हावी म्हणून आपण सर्वजण सभागृहात येतो. जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्ही माफी मागतो” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार यांनी एसआयआरवर आपले मौन सोडावे. मतदार यादीतून कोणत्याही बिहारीचे नाव वगळले जाणार नाही याची खात्री द्या. काल (बुधवार) JDU खासदार गिरिधारी यादव यांनी SIR ला विरोध केला, चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने विरोध केला.
बाबासाहेबांचे संविधान धोक्यात Bihar Vidhan Sabha Monsoon Session।
सभागृहातील राजद नेत्याने विचारले की एसआयआरमध्ये आधार-पॅन का नाही? गरिबांकडे नसलेली कागदपत्रे घेतली जात आहेत. कोट्यवधी स्थलांतरित बिहारी आणि कामगार आहेत. त्या लोकांना फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाइन काम करता येत नाही. मतदानाची ताकद खूप मोठी आहे, बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे. मतदार यादीतून नावे वगळून, गरिबांकडून मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
तेजस्वी म्हणाले की, “निवडणूक आयोगाचे काम निष्पक्ष निवडणुका घेणे आहे. एसआयआर प्रक्रिया योग्य नाही. निवडणूक आयोगाने कुठेही असे म्हटले नाही की पडताळणी दरम्यान घुसखोर आढळले. मग भाजप एनडीए नेते घुसखोर सापडले आहेत असे कसे म्हणत आहेत?असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
विरोधकांनी काळा कुर्ता घालून निषेध Bihar Vidhan Sabha Monsoon Session।
दुसरीकडे, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, महाआघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पोर्टिकोमध्ये काळा कुर्ता घालून एसआयआरचा निषेध केला. त्यांच्या हातात बॅनर आणि पोस्टर्स होते. सदस्यांनी बिहार आणि केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. एसआयआर मागे घ्यावा अशी मागणी आहे. “एनडीए सरकार हटवा, मतदान बंदी चालणार नाही” अशा घोषणा देत त्यांनी विधानसभेला एसआयआरविरुद्ध ठराव मंजूर करण्याची मागणी केली.





