Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ५१ उमेदवारांचा समावेश असून, अॅडव्होकेट वाय. व्ही. गिरी, भोजपुरी गायक-अभिनेता रितेश पांडेय यांसारख्या काही नामांकित व्यक्तींची नावेही यात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत — ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर राघोपुर येथून निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत. कोणाला कुठून उमेदवारी? क्र. उमेदवाराचे नाव मतदारसंघ 1 राहुल कीर्ती सिंह रघुनाथपूर 2 सुनील कुमार लौरिया 3 सत्येंद्र कुमार यादव दरभंगा 4 मोहम्मद परवेज आलम बेनीपट्टी 5 सुरेंद्र कुमार सहनी बेगूसराय 6 दीर्घ नारायण प्रसाद वाल्मीकी नगर 7 अवधेश राम हरसिद्धी 8 रागिब बबलू सिकटी 9 अबू अफाक फारुक कोचाधामन 10 अफरोज आलम पूर्णिया (अमौर) 11 सुबोध सुमन मधेपुरा (आलमनगर) 12 किशोर कुमार मुन्ना सहरसा 13 सुरेंद्र यादव सिमरी बख्तियारपूर 14 शमीम अख्तर महिषी 15 आर. के. मिश्रा दरभंगा 16 तेजनारायण सहनी मीनापुर 17 डॉ. शशिशेखर सिन्हा गोपालगंज 18 प्रीती किन्नर भोरे 19 वाय. व्ही. गिरी मांझी 20 जेपी सिंह छपरा 21 मुसाफिर महतो परसा 22 चंदन मेहता सोनपुर 23 रामबालक पासवान कल्याणपूर 24 डॉ. जागृती ठाकूर मोरबा 25 सुरेंद्र साहनी बेगूसराय 26 जयंती पटेल खगडिया 27 गजेंद्र कुमार सिंह निषाद बेलदौर 28 घनश्याम दास पीरपैंती 29 ब्रजकिशोर पंडित बेलहर 30 विनय कुमार बरुण परबत्ता 31 लता सिंह अस्थावा 32 दिनेश कुमार बिहारशरीफ 33 कुमार पूनम सिन्हा नालंदा 34 प्रो. के. सी. सिन्हा कुम्हरार 35 डॉ. विजय गुप्ता आरा 36 नेहा नटराज चेनारी 37 रितेश पांडेय (अभिनेता) करगहर 38 अर्चना चंद्रा यादव नबीनगर 39 डॉ. अजीत कुमार इमामगंज 40 लक्ष्मण मांझी बोधगया टीप: यादीत ५१ उमेदवारांचा उल्लेख करण्यात आला असला तरी उपलब्ध माहितीनुसार ४० प्रमुख उमेदवारांची नावे समोर आली आहेत. उर्वरित उमेदवारांची माहिती पुढील घोषणांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.