बिहारचे मुख्यमंत्री गायब
Updated On:

पटना : नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) आणि एनआरसी या मुद्दय़ावरून बिहारमध्ये राजकारण तीव्र झाले आहे. या विषयी राजधानी पटनामध्येही पोस्टर वॉर सुरू झाले आहे. यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात आरजेडी कार्यालयाबाहेर एका पोस्टर चिटकवण्यात आले आहे .
पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मुका, बहिरा, अंध म्हणले आहे. पोस्टर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोस्टरमध्ये कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा व्यक्तीचा उल्लेख नाही.
या पोस्टर्सवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरजेडी नेते म्हणाले की, आमचा पक्ष असं वागत नाही. आरजेडीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ते म्हणाले की पोलिस आणि प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली .
टॅग्स:





