तेजस्वी यादव यांच्या अध्यक्षतेखाली १२ जूनला महायुतीची बैठक ; काय असेल अजेंडा? वाचा सविस्तर

Bihar Assembly Election 2025 । बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात महायुतीची पुन्हा एक बैठक आयोजित काण्यात आली आहे. ही बैठक येत्या १२ जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तेजस्वी यादव यांच्या अध्यक्षतेखाली पाटणा याठिकाणी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.
महायुतीची ही चौथी बैठक Bihar Assembly Election 2025 ।
विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीची ही चौथी बैठक आहे. त्यात आरजेडी, काँग्रेस, विकासशील इन्सान पार्टी, सीपीआय एमएल, सीपीआय आणि सीपीएमचे नेते उपस्थित राहतील. समन्वय समितीच्या सदस्यांसह, सर्व उपसमित्यांचे सदस्य देखील या बैठकीत उपस्थित राहतील.
तेजस्वी प्रसाद यादव, अब्दुल बारी सिद्दीकी, संजय यादव, आरजेडीकडून आलोक मेहता रणविजय साहू, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष राजेश राम, प्रभारी कृष्णा अल्लावरू, विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान, डॉ. मदन मोहन झा, कुणाल, धीरेंद्र झा, सीपीआय एमएलकडून राजाराम सिंह, सीपीएमकडून लालन चौधरी, अजय कुमार, अवधेश कुमार इत्यादी बैठकीला उपस्थित राहतील. सीपीआयकडून रामनरेश पांडे, रामबाबू कुमार, अजय कुमार सिंह उपस्थित राहतील तर व्हीआयपीकडून मुकेश साहनी उपस्थित राहतील.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल? Bihar Assembly Election 2025 ।
बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या बैठकीत संयुक्त निवडणूक प्रचाराची रूपरेषा, किमान समान कार्यक्रम ठरवता येणार आहे. निवडणूक रणनीतीवर विचारमंथन होईल, बूथ पातळीपर्यंत मित्रपक्षांमध्ये समन्वय कसा राखायचा यावर चर्चा होईल. एनडीए सरकारला कोणत्या मुद्द्यांवर कोंडीत पकडायचे यावर सविस्तर चर्चा होईल. महायुतीचे निवडणूक मुद्दे अंतिम केले जातील असेही सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे त्याच वेळी, राजद तेजस्वी यांना महायुतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणते, परंतु सध्या काँग्रेस एकमत नसल्याचे दिसून येत आहे. १२ जून रोजी तेजस्वी हे महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याची औपचारिक घोषणा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे? महायुतीची पहिली बैठक १७ एप्रिल रोजी राजद कार्यालयात झाली. त्यानंतर २४ एप्रिल रोजी प्रदेश काँग्रेस मुख्यालयात बैठक झाली. यानंतर, ४ मे रोजी दिघा येथे महायुतीतील सर्व पक्षांच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय नेत्यांची बैठक झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत तेजस्वी यांची समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
हेही वाचा
दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने; एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाही स्वतंत्र मेळावे





