‘बिग बॉस ओटीटी 3’ची विजेती सना मकबूल ‘या’ आजाराचा करतेय सामना

Sana Makbul | ‘बिग बॉस ओटीटी सीजन 3’ ची विजेती सना मकबुल एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. नुकतेच तिने भारती सिंहच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. ज्यात तिने 2020 पासून एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, हिंदी इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार काही आजारांचा सामना करत आहे. हिना खानसह काही कलाकरांनी याची माहिती चाहत्यांसोबत शेअरही केली होती. आता सना मकबुलने देखील ‘ऑटोइम्युन हेपेटायटिस’ आजार झाला असल्याचे सांगितले.
सनाने सांगितलं की, “मला 2020 मध्ये हा आजार झाला असून सुरुवातीला कोणतीही विशिष्ट लक्षण नव्हती. पण हळूहळू माझी तब्येत बिघडू लागली. जेव्हा माझी चाचणी करण्यात आली तेव्हा मला ऑटोइम्युन हेपेटायटिस असल्याचं समजलं. यामुळे माझ्या पेशी माझ्या यकृतावर हल्ला करतात. ज्यामुळे माझ्या मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो किंवा संधीवातही होऊ शकतो.”
पुढे ती म्हणाली, “या आजाराशी लढण्यासाठी मला अनेक औषधांची मदत घ्यावी लागते. यासाठी मी स्टिरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसन्ट्स घेत आहे. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही याबद्दल डॉक्टरांचे मत स्पष्ट नाही. मात्र या आजारामुळे माझी तब्येत सतत बदलत असते. कधीकधी मला खूप अशक्तपणा जाणवतो. हा आजार झाल्यानंतर मी पूर्णपणे शाकाहारी झाली आहे.” या आजारातून बरी होईल की नाही, याबाबत देखील तिने शंका उपस्थित केली आहे. Sana Makbul |
सनाने हा खुलासा केल्यानंतर चाहत्यांनीही तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, सनाने इस प्यार को क्या नाम दु, अर्जुन, विष यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस ओटीटी जिंकल्यानंतर ती काही म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली. Sana Makbul |
हेही वाचा:
‘लाडकी बहीण योजना बंद केली तर…’, शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य





