‘बिग बॉस मराठी’ विजेता सूरज चव्हाणची अभिरुची मॉल येथील पी.एन. गाडगीळ आणि सन्स शोरूमला भेट

पुणे – ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाणने पुण्यातील सिंहगड रोडवरील अभिरुची मॉल येथील पी.एन. गाडगीळ आणि सन्स शोरूमला भेट दिली. सूरजच्या भेटीमुळे चाहत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी सूरजने शोरूममधील अप्रतिम सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी केली व उपस्थितांशी संवाद साधला.
अभिरुची मॉलमधील पी.एन. गाडगीळ आणि सन्स शोरूम हा परिसरातील सर्वात मोठ्या दागिन्यांच्या शोरूम्सपैकी एक आहे. गेल्या १० वर्षांपासून हे शोरूम आपले ग्राहक प्रेमाने आणि आपुलकीने सेवा देत आहे. उत्कृष्ट दर्जा, पारंपारिकता आणि अद्ययावत डिझाइन्स यामुळे हे शोरूम सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे.
ग्राहकांना पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने असो वा आधुनिक डिझाइन्स, येथे प्रत्येकाच्या आवडीनुसार दागिने मिळतात, ज्यामुळे हे शोरूम पुण्यातील ग्राहकांच्या विश्वासाचे ठिकाण ठरले आहे.
सध्या दिवाळीच्या निमित्ताने पी.एन. गाडगीळ आणि सन्स सर्व ३० शोरूममध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर चालू आहे. ग्राहकांना सोने दागिन्यांवर ५०% पर्यंत घडणावळ शुल्कावर सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर १००% पर्यंत घडणावळ शुल्कावर सूट दिली जात आहे. ही खास ऑफर ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध आहे, ज्यामुळे या सणासुदीच्या काळात ग्राहकांना त्यांच्या आवडत्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी आहे.
या प्रसंगी सूरजने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, “पी.एन. गाडगीळ आणि सन्स सारख्या वारसा असलेल्या ब्रँडला भेट देणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा ब्रँड महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. येथील अत्यंत सुंदर दागिने आणि दिवाळीच्या आकर्षक ऑफर विषयी, त्याने त्याच्या खास झापुक झुपुक style मध्ये अभिप्राय दिला”.
अभिरुची मॉल येथील पी.एन. गाडगीळ आणि सन्स शोरूम ग्राहकांना केवळ अप्रतिम दागिनेच नाही, तर उत्कृष्ट सेवा देखील प्रदान करते. येथे प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिकरित्या सन्मानपूर्वक सेवा दिली जाते, ज्यामुळे त्यांचा खरेदीचा अनुभव संस्मरणीय ठरतो. सणासुदीच्या काळात, लग्नाच्या खरेदीसाठी किंवा खास प्रसंगासाठी, शोरूममधील कर्मचारी ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतांनुसार योग्य दागिने निवडण्यास मदत करतात.
सूरज चव्हाणच्या भेटीने पी.एन. गाडगीळ आणि सन्स शोरूममध्ये सणासुदीची सुरुवात झाली आहे. अधिक माहितीसाठी अभिरुची मॉल, सिंहगड रोड, पुणे येथील पी.एन. गाडगीळ आणि सन्स शोरूमला भेट द्या किंवा ७८८८०३५६६० वर संपर्क साधा.
पी.एन. गाडगीळ आणि सन्स बद्दल –
पी.एन. गाडगीळ आणि सन्स हा भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित दागिन्यांच्या ब्रँड्सपैकी एक आहे, जो उत्कृष्ट कारागिरी, गुणवत्ता आणि ग्राहक सेवेमध्ये आपल्या वारशासाठी ओळखला जातो. शंभर वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या या ब्रँडमध्ये पारंपारिक तसेच आधुनिक दागिन्यांचा विस्तृत संग्रह आहे, ज्यामुळे प्रत्येक ग्राहकाला त्यांच्यासाठी काहीतरी खास मिळते.





