Bigg Boss Marathi 5: ‘बीबी’च्या घरात रंगणार पहिला कॅप्टन्सी टास्क! कोणाला मिळणार कॅप्टन होण्याचा मान? पाहा Video

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये दहाव्या दिवशी पहिलं कॅप्टनसी कार्य आयोजित करण्यात आलं आहे. घरामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे, प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशीच एक स्पर्धा आज रात्री ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या एपिसोडमध्ये रंगलेली पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये कॅप्टन बनण्यासाठी एक टास्क आयोजित करण्यात येईल.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा आजच्या भागाचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोवरुन ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज घरात ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य कॅप्टन होण्यासाठी टास्कमध्ये धडपड करताना दिसून येत आहेत.
या बुलेट ट्रेनमध्ये एक सीटसाठी रेटारेटी होतानादेखील पाहायला मिळत आहे. नव्या सीझनला घराचा पहिला कॅप्टन मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन होणं अत्यंत मानाचे मानले जाते. आता बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या भागात याचा उलगडा होणार आहे.





