Bigg Boss Marathi 5 : संग्रामने पहिल्याच दिवशी घेतला निक्कीसोबत पंगा; थेट दिलं पाण्यात ढकलून, पाहा Video

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे. त्याला घरातल्या पहिल्या दिवसापासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्याचा पहिला दिवसच टास्कपासून सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी टास्कमध्ये सदस्यांसोबत वाद घालताना संग्राम दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज जादुई विहिरीत कोण पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे अपात्र आहेत”. त्यानंतर संग्राम जादुई विहिरीत निक्कीला पडायला सांगतो. पण मेडिकल कंडिशनचं कारण देत निक्की विहिरीत पडायला नकार देते. दरम्यान संग्राम निक्कीला जादुई विहिरीत ढकलतो. संग्रामने घरात आल्या आल्या निक्कीसोबत घेतलेला पंगा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेईल.
View this post on Instagram
‘हा’ ग्रुप अंकिता अन् डीपी दादांवर घालणार पहिला घाव
अंकिता डीपी दादांना म्हणतेय,”डीपी दादा तुम्ही नॉमिनेशनमध्ये होतात तेव्हा एक वाक्य बोलला होतात विश्वासाबद्दल. मला पलटणारी लोक आवडत नाहीत. मी जेव्हा घरातून जाणार होते तेव्हा मी अभिजीतला म्हणाले होते,”स्टँड घे.. पलटू नको”. त्यावर डीपी दादा म्हणतात,”हा ग्रुप सगळ्यात पहिला घाव तुझ्यावर आणि माझ्यावर घालणार आहे”.
कोण आहे संग्राम चौगुले?
बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याने दीड मिलियन फॉलोअर्स आहेत. फिटनेसवर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आजवर त्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. त्याची स्वत:ची एक आलिशान जीमदेखील आहे.





